झाडाखाली दुचाकीस्वार अडकला !

Edited by: मनोज पवार
Published on: July 20, 2024 05:19 AM
views 130  views

मंडणगड :  तालुक्यात सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कुंबळे  येथे खेड पुरार राज्यमार्गावर सांयकाळच्या सुमारास झाड कोसळले कोसळणार झाडे दस्तुरी ते मंडणगड तेहत्तीस के.व्ही. विज वाहिनीवर कोसळल्याने सुमारे तीन तासांकरिता पुर्ण तालुक्याचा विजपुरवठा खंडीत झाला. याचबरोबर महामार्गावरील वाहतूक पुर्णपणे प्रभावीत झाली. झाड कोसळत असताना रस्त्यावरुन प्रवास करणारा दुचाकी स्वार ऋुत्विक कदम राहणार लाटवण हा झाडाखाली अडकल्याने जखमी झाला. त्याच्यावर   प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे येथे प्रथमोपचार करुन पुढील उपचाराकरिता महाड येथे पाठवण्यात आले.

 घटनेचे वृत्त कळताच मंडणगड तहसिल कार्यालयाचे आपत्ती निवारण पथक, मंडळ अधिकारी व तलाठी कुंबळे घटनास्थळी दाखल झाले सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंडणगड यांनी महामार्गावर पडलेले  झाड तातडीने  हटविण्यासाठी जी.से.बी  पाठविले दोन तासांचे अथक परिश्रमानंतर  झाड रस्त्यावरुन बाजूल करुन वाहतूक पुर्ववत करण्यात आली. विजवाहीनीवर झाड पडल्याने महावितरणचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन खंडीत विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे.