
सावंतवाडी : सावंतवाडीहून हुकेरी - बेळगाव येथे जाणारे सय्यद अली गजबर साब मकानदार आणि फिदाहुसेन मीरासाब मकानदार आंबोली घाटातून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीची धडक आंबोली मुख्य दरडीच्या ठिकाणी घाटमार्गात संरक्षक कठड्याला बसली. त्यात दुचाकीच्या मागे बसलेला फिदा हुसेन मकानदार हा थेट एक हजार फूट खोल दरीत कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. परंतु, दरीत कोसळलेल्या युवकाला आंबोली रेस्क्यू टीमच्या मदतीने दरीतून सुखरू बाहेर काढण्यात यश आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.