
सावंतवाडी : ग्रामपंचायत भोमवाडी यांच्या अधिकार क्षेत्रातील घराची आकारणी होऊनही घर नंबर मिळण्यास विलंब होत असल्याने राकेश तुकाराम गोवेकर यांनी जिल्हाधिकारी यांच लक्ष वेधलं आहे. तसेच स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. तर ग्रामसेवक भक्ती भगवान शेटकर- परब यांच्यावर वरिष्ठांचे लेखी आदेशाचे अवमान करून जाणीवपूर्वक, हेतुपुरस्कर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
श्री. गोवेकर यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत भोमवाडी, ता. सावंतवाडी हद्दीतील ग्रामसेवक, श्रीमती भक्ती भगवान शेटकर- परब यांच्यावर वरिष्ठांचे लेखी आदेशाचे अवमान करून जाणीवपूर्वक, हेतुपुरस्कर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करावी. ग्रामसेवक यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्या प्रमाणे त्याच्यावर महाराष्ट्र अधिनियम १९५८ अन्वये कलम ३९ प्रमाणे आपणा स्तरावरून चौकशीचे त्वरित आदेश होऊन, तत्काळ कारवाही करण्यात यावी ही अर्जदार तर्फे प्रमुख मागणी आहे. तसेच दि. २५ जाने.२०२४ ग्रामपंचायतीचे मला दिलेल्या पत्रात आपल्या मागणी बाबत ग्रामपंचायत प्रशासन सकारात्मक असून वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने उपोषणासारखा मार्ग न अवलंबता ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे व उपोषण मागे घ्यावे हि विनंती केली. म्हणून २६ जानेवारीचे उपोषण स्थगित केले. तरी मला न्याय मिळाला नाही. त्यासाठी मी आता जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी माझ्या उपोषणाची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक श्रीमती भक्ती भगवान शेटकर-परब यांच्यावर राहील अस श्री. गोवेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.