साळशीतील वार्षिक होलिकोत्सवास सुरुवात...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 26, 2024 14:27 PM
views 45  views

देवगड : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व ८४ खेड्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी गावच्या इनामदार श्रीदेव सिद्धेश्वर-पावणाईचा होलिकोत्सव पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे साजरा होत आहे.पाच दिवस चालणाऱ्या होलिकोत्सवाची सुरुवात फाल्गुन पौर्णिमेपासून होते. इनामदार श्रीदेवी पावणाईच्या देवालयात नाईक, मिराशी, गावकर व बारा - पाच मानकरी जमतात. होळीसाठी आवश्यक असलेल्या आंब्याच्याची देव मांडावर जात नाहीत इतर गावांच्या रितीरिवाजा प्रमाणे साळशी गावच्या शिवकळा होळीच्या मांडावर जात नाहीत. होलिकोत्सवाच्या पाच दिवसात इनामदार श्रीदेव सिद्धेश्वर - पावणाई या दोन्ही देवालयात कौलप्रसाद बंद असतात.यावेळी होळदेवाकडे कौलप्रसाद घेऊन येणाऱ्या लोकांच्या अडचणी सोडविल्या जातात.... झाडाची ज्या ठिकाणी पाहणी केली आहे तिथपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात जाऊन होळीसाठी लागणाऱ्या दोन झाडांची घाडी व पारधी तोड करतात. आंब्याच्या पानांनीच (आंबेरी) होळी सजविली जाते. होळीच्या टोकावर लागणारे शुभ्र रंगाचे निशाण साळसकर (परीट) यांच्याकडून दिले जाते.प्रथम श्रीदेव तळखांबा वशिकाच्या देवालयासमोर तसेच इनामदार श्रीदेवी पावणाई देवालयासमोर पूजन दुसऱ्या दिवसापासून खेळे गावात व गावाबाहेरील घराघरात जातात. पाचव्या दिवशी निशाण व तळी इनामदार श्रीदेव सिद्धेश्वराच्या होळीकडे पूजन देवालयाजवळ व त्यानंतर करण्यात येते. ढोल-ताशांच्या गजरात नाईक, मिराशी, गावकर, कुलकर्णी यांच्या घरी व त्यानंतर गावात घरोघरी निशाण तळी नेली जाते.

८४ देवीची होळी (गावहोळी) घातली जाते. त्यानंतरच गावातील बारा स्थळांत होळ्या घातल्या जातात, त्याही आंब्याच्याच असतात. गावहोळीची ब्राह्मणकरवी पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी होळी उत्सवाबाबत होळीच्या होळदेवाकडे कौलप्रसादाने मान्यता घेऊन गावघराची रखवाली घेतली जाते. त्यानंतरच कौल प्रसादास

पारंपरिक रोंबाटाचे आकर्षण...

राँबाट या पारंपरिक कार्यक्रमासाठी मिराशी, नाईक, गावकर यांच्याकडून २१ नारळ देण्याची प्रथा आहे. पूर्वापार पद्धतीप्रमाणे होळी उत्सवाकडे वावरणाऱ्या लोकांना नारळ दिला जातो. त्यावेळी साळशी गावचे शिवधडे म्हणून आयनल गावचे साटम, शिरगावचे साटम, किंजवडे गावचे देसाई व पोलिस ठाणे यांना मानाचा नारळ दिला जातो. रॉबाट या कार्यक्रमात गण, गवळण व गावकोळनीचा लग्नसोहळा होतो. रात्री बारा वाजल्यानंतर धूळ मारण्याच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते. मिराशी, नाईक, गावकर हजेरीत चैत्र महिन्याच्या घाडी व पारधी यांच्याकडून पुढील चैत्र पौर्णिमेला होळी तोडली जाते. त्यावेळी होळीच्या आंबेऱ्यात बांधलेला नारळ वाढवून त्याचा प्रसाद येथे असलेल्या उपस्थितांना देतात.

सुरुवात करून येणाऱ्या लोकांच्या अडचणी सोडविल्या जातात. रात्री होळीच्या मांडचा अधिकारी येथून कुबडे व शिंपी समाजाच्यावतीने गावकोळीन सजवून गावहोळीच्या ठिकाणी आणली जाते. तेथे एखादा वग म्हटंला जातो. होळदेवासमोर नारळाची नवशिक देणी किंवा रखवालीबद्दल नारळ बारा - पाच मानकऱ्यांच्या समवेत दिले जातात. त्यानंतर इनामदार श्रीदेवी पावणाईच्या सभामंडपात शिंपी समाजाच्यावतीने तमाशाचा कार्यक्रम होतो.