करुळ भट्टीवाडीतील वाघजाई देवीचा वर्धापन दिन ३० एप्रिलला

विविध कार्यक्रमांचे आयोजन
Edited by:
Published on: April 28, 2025 17:32 PM
views 138  views

वैभववाडी : करुळ भट्टीवाडी ग्रामस्थ मंडळ व भट्टीवाडी सेवा मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ३० एप्रिल रोजी श्री वाघजाई देवी वर्धापन सोहळा (रौप्य महोत्सवी वर्ष), मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा  पुढीलप्रमाणे सकाळी ५.३० वा. श्री वाघजाई देवीचा अभिषेक, सकाळी ६ ते ७ वा. होमहवन, सकाळी ९.३० वा. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेतून पंचायत समिती वैभववाडी व ग्रामपंचायत करुळ यांच्या सहकार्यातून मंदीर परिसरातील नूतन सुलभ शौचालय उद्घाटन सोहळा, सकाळी १० वा.  श्री वाघजाई देवी पादुकांची मिरवणूक (श्री रामेश्वर भूतनाथ ढोल पथक, मु. पो. मुटाट (घाडीवाडी), ता.देवगड. सकाळी ११.३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० ते २.३० वा. : सर्व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वा.  महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ ते ६ वा. महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम व आकर्षक बक्षीस, रात्री ७ ते ८ वा. करूळ ग्रामस्थ वारकरी संप्रदायांचा हरीपाठ कार्यक्रम, रात्री ८.३० वा. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ व मनोगत, रात्री ९ ते ११ वा. शिवचरित्रकार ह.भ.प. दौलत महाराज बोडखे आळंदी (देवाची ) यांचे कीर्तन, रात्री ११ वा. महिलांचा समई नृत्य कार्यक्रम श्री समर्थ समई नृत्य व फुगडी पथक, मु. पोस्ट खुडी - जुवीवाडी, ता.देवगड. या कार्यक्रमाला परिसरातील भाविक व गावातील भाविक, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.