खांबाळे येथील आदिष्टी मंदिराचा ३० एप्रिलला वर्धापनदिन

किर्तनकार शिवलीला पाटील यांचे होणार किर्तन,
Edited by:
Published on: April 28, 2025 18:33 PM
views 17  views

वैभववाडी : खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टी मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापनदिन सोहळा ३० एप्रिल आणि १ मे रोजी होतं आहे.यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचे किर्तन होणार आहे.

खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टी मंदिराचा  जिर्णोध्दाराचा वर्धापन दिन दरवर्षी अक्षय तृतीया या दिवशी होतो.यावर्षी हा  सोहळा ३० एप्रिलला होणार आहे.या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.३० एप्रिलला रात्री १० वाजता प्रसिध्द किर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे किर्तन होणार आहे.पहाटे पाच वाजल्यापासुन या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.पहाटे ५ ते ७ या वेळेत प्रांतस्मरण,काकड आरती,सकाळी ९ वाजता – श्री.सत्यनारायण महापुजा,सकाळी ११ ते दुपारी १२..३० या वेळेत वारकरी दिंडी,१ वाजता महाप्रसाद,सायकांळी ६ ते रात्री ८ हरिपाठ,रात्री ९ वाजता पालखी सोहळा,रात्री १० वाजता- .शिवलीला पाटील यांचे किर्तन

१ मे रोजी दुपारी २.३० वाजता-हळदीकुंकु,रात्री ९ ते १० पालखी मिरवणुक,रात्री १० वाजता खुली नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत ३५ स्पर्धक सहभागी झाले आहेत.या संपुर्ण सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.देवी आदिष्टी देवस्थान व्यवस्थापन स्थानिक सल्लागार समिती खांबाळे च्या वतीने करण्यात आले आहे.