तुमच्या मदतीनं गेलेला मुलगा परत येणार का ?

संतप्त ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांना सुनावलं
Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 19:53 PM
views 133  views

सावंतवाडी : ओटवणे गवळीवाडी येथील शाळकरी मुलाचा गुरूवारी दुर्देवी मृत्यू झाला. विनय कोटकर असं या विद्यार्थ्याच नाव असून विद्युतभारीत वीज वाहिनी तुटून ओटवणे-बावळाट सीमेदरम्यानच्या तेरेखोल नदी पात्रात पडल्यानं ही दुर्दैवी घटना घडली. 

ओटवणे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत तो शिकत होता. नदीपलीकडे गेलेल्या म्हशी आणण्यासाठी गेला असता हा प्रकार घडला. विद्युतभारीत वीज वाहिनी तुटून ओटवणे-बावळाट सीमेदरम्यानच्या तेरेखोल नदी पात्रात पडल्यानं त्या १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हकनाक जीव गेला. विनयच्या या अकाली जाण्याने कुटुंबासह गावावर दुःखाचा डोगंर कोसळाल. आज गावात आलेल्या महावितरण अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत कार्यकारी अभियंतांना खडेबोल सुनावलेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला नुकसान भरपाई देऊन गेलेला जीव पुन्हा येणार का ? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी केला. तर ट्रान्स्फॉर्मरची झालेली सध्याचा अवस्थेवरून देखील खडेबोल सुनावले. आज सायंकाळी उशिरा विनयच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.