
सावंतवाडी : पिंपरी चिंचवड येथील सुवर्ण पेढीवर दरोडा टाकून पळून जाणाऱ्या तीन दरोडेखोरांच्या आंबोली पोलीसांनी ट्रॅप लावून मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडील बंदूका व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली क्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता देसाई, पोलिस हवालदार दीपेश शिंदे यांच्यासह अन्य पोलिसांनी केली.