
देवगड : देवगड दहीबाव येथील अन्नपूर्णा नदीच्या पुलाचे काम सुरू असल्यामुळे करण्यात आलेला पर्यायी रस्ता मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे दहीबाव नारिंग्रे या दोन गावांचा संपर्क तुटला असून देवगड - मालवण या दोन तालुक्यांची वाहतूक सेवा देखील त्यामुळे ठप्प झाली आहे.
तसेच वानिवडे - रहाटेश्वर कालवीवाडी येथील पुलाच्या कामामुळे करण्यात आलेल्या पर्यायी मार्ग देखील वाहून गेल्यामुळे तळवडे गढीताम्हने पावणाई या गावांचा देखील संपर्क तुटला गेला आहे.