
सिंधुदुर्गनगरी : शासन प्रशासन यांनी एकत्र येऊन जनतेचे प्रश्न सोडवावेत आणि जनतेला न्याय मिळावा. आपल्या प्रश्नांसाठी वारंवार लोकांना येरा जारा घालाव्या लागू नयेत यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. बुधवारी तिसऱ्या दिवशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जनता दरबारचा शुभारंभ दिप प्रज्वलन करुन झाला. या तिसऱ्या दिवशीच्या जनता दरबारालाही जनतेतून स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. या दरबारासाठी सकाळपर्यंत एकूण 139 एवढे तक्रार अर्ज दाखल झाले होते.