राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात !

Edited by: भरत केसरकर
Published on: November 08, 2023 12:07 PM
views 164  views

सिंधुदुर्ग : राज्य सरकारी आणि निम सरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, समन्वय समितीचा भव्य दिव्य मोर्चा थोड्याच वेळात ओरोस रवळनाथ मंदिर येथून निघणार आहे. जुनी पेन्शन चालू करा,आठव्या वेतन आयोगाची समिती गठीत करा, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, खासगीकरण आणि कंत्राटी करण रद्द करणे, १०० टक्के नोकर भरती करणे, पदोन्नती देणे यासह विविध मागणीसाठी आजचा हा मोर्चा निघणार आहे. हे राज्यव्यापी आंदोलन ३६ ही जिल्ह्यात आज काढण्यात येणार आहे.

शासनाविरोधात हे आंदोलन आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. आपल्या कुटुंबासहित हे राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आरोप येथील रवळनाथ मंदिरात पहिल्यांदा छोटेखानी सभा होणार असून यानंतर हे सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने जमण्यास सुरूवात झाली आहे.

यावेळी शिक्षक समितीचे राज्याचे सरचिटणीस तथा राज्य कर्मचारी जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, राजन वालावलकर, सचिन माने, सखाराम सकपाळ, नारायण नाईक, सचिन मदने, ए.डी.राणे, किशोर कदम, विनोद सावंत यासह अनेक संघटनाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.