...अखेर जिल्ह्यातील तलाठ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 26, 2023 16:27 PM
views 170  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यात तलाठ्यांनी अतिरिक्त तलाठी सजा कार्यालय बंद ठेवत सुरू केलेले आंदोलन अखेर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती आज तलाठी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष सत्‍यवान गवस यांनी दिली.

जमाबंदी आयुक्त पुणे यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती मागण्या सर्व अडिअडचणी सोडविण्‍या बाबत सकारात्‍मक प्रतिसाद मिळून सदरच्‍या  अडिअडचणी मार्गी लावणे बाबत दोन्‍ही जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी व निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनी आश्‍वस्‍त करुन जमाबंदी आयुक्‍त कार्यालयात अडिअडचणी बाबत विचार विनिमय सभेसाठी आग्रही राहणार असलेचे आंदोलनातील निवेदना प्रमाणे मान्‍य केले असल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची तलाठी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष सत्‍यवान गवस यांनी दिली.

 कुडाळ तालुक्यातील 39 तलाठी सजा कार्यालय तब्बल 11 दिवस बंद ठेवण्यात आली होती, मात्र 26 ऑक्टोबर पासून ही तलाठी सजा कार्यालय नियमित सुरू राहणार आहेत, अशी माहिती कुडाळ तलाठी महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री. गंगावणे यांनी दिले.

पुणे येथील जमाबंदी आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठी महासंघाचे जिल्हाध्यक्ष  सत्‍यवान गवस, उपाध्‍यक्ष  दिलीप पाटील, रत्‍नागिरी जिल्हा उपाध्‍यक्ष संजय गांवकर, सरचिटणीस महादेव गवस, खजिनदार  पिटर लोबो व कार्यकारणी पदाधिकारी/तलाठी बैठकिस उपस्‍थि‍त होते.