उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडली कृती समितीने भूमिका

आडाळी MIDCतील प्रस्तावित गोल्फ कोर्स व रिसॉर्ट प्रकल्पाला तात्काळ स्थगिती
Edited by:
Published on: November 08, 2025 18:59 PM
views 102  views

कुडाळ : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांची शनिवारी (ता.८) आडाळी MIDC कृती समितीने भेट घेऊन आपली भूमिका मांडली. मंत्री सामंत यांनी पुढील एका महिन्यात MIDC अधिकारी, प्लॉटधारक उद्योजक आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेण्याचे यावेळी आश्वासन दिले.

 ग्रामस्थांची संमती मिळाल्याशिवाय प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे कृती समितीने म्हटलंय. या भेटीवेळी आमदार दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.

कुडाळ : येथील एमआयडीसी विश्रामगृहात उदयोगमंत्री उदय सामंत व आडाळी सरपंच पराग गांवकर यांच्यात प्रास्तावित गोल्फ प्रकल्प बाबत बैठक झाली. यावेळी आमदार केसरकर, माजी आमदार राजन तेली, कृती समिती सचिव प्रवीण गांवकर उपस्थित होते.

आडाळी एमआयडीसी तील भूखंड हे उद्योगासाठीच आहेत. सर्व उद्योजकासोबत आठ दिवसात आडाळीत बैठक घेऊन प्रक्रिया सुरु कारण्यात येईल. गोल्फ हा रोजगार निर्मितीसाठी फायदेशीर प्रकल्प आहे. स्थानिकांना त्याचे प्रेझेंटेशन देऊनच पुढील निर्णय घेणार असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरपंच पराग गांवकर यांचेसोबतच्या कुडाळ येथील बैठकित दिले. 

आडाळी एमआयडीसीत गोल्फ प्रकल्प मंजूर करण्यासाठी महामंडळकडून हालचाली सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत येथील भूखंड वाटप, बांधकाम परवानगी आदी सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. महामंडळच्या या भूमिकेमुळे एमआयडीसी उभारणी   व उद्योग यावेत म्हणून सतत पाठपुरावा करणाऱ्या आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीने  महामंडळच्या भूमिकेला आक्षेप घेतला. आज कुडाळ येथे विश्रामगृहावर उद्योगमंत्री सामंत व सरपंच गांवकर यांच्यात सुमारे वीस मिनिटे सविस्तर चर्चा झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर,माजी आमदार राजन तेली, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कृती समिती सचिव प्रवीण गांवकर उपस्थित होते. 

यावेळी श्री. गांवकर म्हणाले कि ज्या उद्योजकांनी दोन वर्षांपूर्वी भूखंड घेतले आहेत त्यांना बांधकाम परवाने थांबवले आहेत. नवीन भूखंड स्थगित केल्याने उद्योजकामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे जे उद्योजक आलेले आहेत त्यांची प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी केली. यावेळी श्री. सामंत यांनी स्पष्ट केले कि कुठल्याही उद्योजकांच्या भूखंड मध्ये बदल केला जाणार नाही. गोल्फ साठी टेबल प्लॉट दिला जाणार नाही. जो उंच सखल भाग आहे तोच या प्रकल्पला दिला जाईल. पण त्याआधी प्रकल्पचे पूर्ण प्रेझेंटेशन दिले जाईल. स्थानिकांनी स्वीकारला तरच प्रकल्प पुढे नेण्यात येईल. पण गोल्फ मुळे जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळून शेकडो रोजगार निर्माण होतील. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नयेत. तूर्तास गोल्फ च्या कार्यवाहीला स्थगिती दिलेली आहे. दरम्यान येत्या आठ दिवसात आडाळीत येऊन दीपक केसरकर, संजू परब यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष उद्योजकांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात येतील. यावेळी केसरकर यांनीही उद्योजकांना  वेळेत सुविधा द्या असे अधिकाऱ्यांना सांगितले.