वेंगुर्ल्यात होतोय उद्या ३५ वा व्यापारी एकता मेळावा

विविध व्यक्तींना होणार पुरस्कारांचे वितरण..
Edited by: दिपेश परब
Published on: January 30, 2023 10:28 AM
views 485  views

वेंगुर्ला: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३५वा वार्षिक ‘व्यापारी एकता मेळावा‘ मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. 

या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री हे करणार असून सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत हे विशेष निमंत्रित मान्यवर तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी व वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, सारस्वत बँक संचालक सुनिल सौदागर हे उपस्थित रहाणार आहेत. तर जीएसटी कौन्सिलचे सदस्य सीए. उमेश शर्मा, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, राष्ट्रीय समिती सदस्य विजय केनवडेकर यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे. 

सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत उद्घाटन, मान्यवरांची मनोगते, प्रमुख वक्त्यांचे विचार, महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार वितरण, कै.माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार वितरण, अध्यक्षांचे मनोगत, दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत प्रमुख वक्त्यांचे विचार, जिल्ह्यातील नवउद्योजकांशी गप्पा, कै.प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार प्रदान, सर्वोत्तम तालुकाध्यक्ष पुरस्कार प्रदान, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान, भेटवस्तूंची सोडत व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत.

सिधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या एकजुटीचे प्रतिक म्हणून साजरा होणा¬या वेंगुर्ला व्यापारी व व्यावसायिक संघ आयोजित या व्यापारी एकता मेळाव्यास जिल्ह्यातील व्यापा¬यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर व महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.