मोती तलावात बुडालेल्या 'त्या ' युवतीची ओळख पटली

Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 12:11 PM
views 848  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील मोती तलावात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास एक युवती बुडाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आल्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी मृतदेह बाहेर काढला. या युवतीची ओळख पटली आहे. तन्वी विजय कांबळे (वय १७, रा. न्यू खासकीलवाडा, मूळ रा. चंदगड) असे तिचे नाव आहे. 

   तीचा मृत्यू झाल्याचे समजताच तिची आई उज्वला कांबळे हिला शोक अनावर झाला. घटनास्थळी मृतदेह पाहून ती चक्कर येवून पडली. त्यानंतर तिला  उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली.