
वैभववाडी : नापणे येथील रोहीणी चंद्रकांत खांडेकर यांची ४२ हजारांची चोरीस गेलेली रक्कम पोलीसांनी मिळवून दिली. ही रक्कम दोन अल्पवयीन मुलींनी चोरल्याचे काल दि. २० पोलीस तपासात स्पष्ट झाले. 'त्या' मुलींकडून ही रक्कम पोलीसांनी ताब्यात घेतली आहे .ही चोरी मंगळवारी (ता.१८) दुपारी १२वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास वैभववाडी बसस्थानकात झाली होती.