'त्या' शाळेची निलेश राणेंनी केली पाहणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 24, 2024 12:16 PM
views 458  views

मालवण : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नं. २ या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती. या संदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारी कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी करत संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. जर प्रशासनाकडून कार्यवाही करण्यास विलंब होत असेल तर आपल्या स्वखर्चातून शाळा दुरुस्तीच काम करण्याची व्यवस्था केली असून आज पासून या शाळेच्या दुरुस्तीच काम सुरू होईल. लवकरात लवकर ही शाळा विध्यार्थ्यांसाठी सुरू होईल. असे स्पष्ट केले.