'तो' साडी सेल कणकवलीत पुन्हा सुरू होणार !

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 26, 2023 15:39 PM
views 1113  views

कणकवली : कणकवलीत दोन आठवड्यापूर्वी बंद झालेला व कणकवलीत "वादग्रस्त" ठरलेला अरविंद साडी सेल अखेर पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग तूर्तास तरी मोकळा झाला आहे.

सावंतवाडी पाठोपाठ कणकवली शहरामध्ये 29 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर पर्यंत च्या कालावधीत पूर्वी असलेल्याच कॉलेज रोडवरील लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये हा साडी सेल सुरू होणार आहे. याकरिता सदर हॉलच्या व्यवस्थापकाला नगरपंचायत कणकवली कडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव सुरू झाला.