'ती' बैठक व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून

केसरकरांवर टीका नको : अर्चित पोकळे
Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2024 09:40 AM
views 202  views

सावंतवाडी : नगरपालिकेत झालेली बैठक ही पूर्णपणे व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन होती. व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून ती घेण्यात आली. यात व्यापाऱ्यांचे सर्व प्रश्न मांडण्याची मुभा मिळाली. गेल्या दहा वर्षात बबन साळगावकर यांना नगराध्यक्ष असताना दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या इंदिरा गांधी व्यापारी संकुला साधा रंगही काढता आला नाही असा पलटवार शिवसेनेचे युवा शहरप्रमुख अर्चित पोकळे यांनी केला आहे.

पोकळे म्हणाले, दोन टर्म नगराध्यक्ष पद देऊनही इंदिरा गांधी व्यापारी संकुल आपणास रंगवता आले नाही. त्यामुळे दीपक केसरकर यांच्यावर आपण टीका करू नये. इंदिरा गांधी व्यापारी संकुल मधील व्यापाऱ्यांच्या विनंतीवरूनच ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी आपले मांडले. त्यामुळे शहराचा विकास होत असताना विरोधाला विरोध करण्याचं काम जनतेनं नाकारलेल्या लोकांनी करू नये,असा पलटवार अर्चित पोकळे यांनी बबन साळगावकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या विधानानंतर पलटवार करताना केला.