आखवणे - भोममधील ठाकरेंचे कार्यकर्ते भाजपात

मंत्री नितेश राणेंची उपस्थिती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 18, 2025 15:03 PM
views 91  views

कणकवली : आखवणे - भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. 

प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठाचे आखवणे शाखाप्रमुख रवींद्र गुरव, भोम शाखाप्रमुख संतोष पडवळ, महीला शाखाप्रमुख संजीवनी गुरव, राजेश गुरव, संदीप पाटेकर, मंगेश गुरव, संदीप गुरव, व अन्य कार्यकर्ते यांचा समावेश आहे. यावेळी किशोर कांबळे, श्रीधर फोंडके, ज्ञानेश्वर फोंडके, सुशील कदम, उदय पांचाळ, शांतिनाथ गुरव तसेच भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.