केसरकरांवर कडाडले ठाकरेंचे सैनिक..!

Edited by:
Published on: February 04, 2024 10:05 AM
views 536  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री,  उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीत पार पडली. गांधी चौक येथील या सभेस मोठ्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित राहिले होते. याप्रसंगी उपस्थित नेतेमंडळी स्थानिक आमदार दीपक केसरकरांवर तुटून पडली. 

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आल. त्यानंतर उपस्थित नेतेमंडळींकडून मनोगत व्यक्त करताना केसरकरांवर जोरदार हल्ला चढविण्यात आला‌. उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दहा वर्ष शिवसेनेचे आमदार इथे कार्यरत आहेत. याच गांधी चौकात आम्ही त्यांची जबाबदारी घेतली होती आज त्याची खंत वाटते. पण, ही खंत आता दुर करायला हवी. आगामी निवडणुकीत येणारा खासदार व आमदार हा उद्धव ठाकरेंच्या विचारांचा विजयी करुन आणू असं विधान बाबुराव धुरी यांनी केल. लोकशाही, संविधान भाजपचे लोक मानत नाही. यांना हद्दपार करायची वेळ आता आली आहे. महाविकास आघाडीचे लोक आजच्या सभेत आले आहेत. हा परिवर्तनचा संदेश आहे. उडाले ते कावळे राहीले ते मावळे हा संदेश आज उद्धव ठाकरेंना देऊन त्यांचे हात अधिक बळकट करू असं मत बाबुराव धुरी यांनी व्यक्त केलं. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आपल मत व्यक्त केल. सत्तेसाठी गद्दारी करून काही जण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले. सत्तेसाठी त्यांनी लाचारी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोकणात येत आहेत. संपूर्ण कोकण भगवमय झालं आहे. सर्वसामान्य माणूस हा उद्धव ठाकरेंसोबत आहे. गद्दारांना धडा शिकवण्याच काम हाच सामान्य माणूस करेल असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला‌. तर मोदी सरकारच्या अच्छे दिनचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. राज्य सरकारला सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही अशी टीका त्यांनी केली. तर देशात आता परिवर्तनाची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारला जनता कंटाळली आहे. फक्त टीव्हीवर जाहिराती दाखवल्यापुर्ती हे सरकार आहे. दिशाभूल करण्याच काम ते करत आहेत. इथल्या मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं देखील हवेत विरली आहेत असं मत सतिश सावंत यांनी व्यक्त करत उद्याच्या लोकसभेत खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा निवडून द्या असं आवाहन केलं. कुणीतरी सभा उधळून लावायची भाषा करत आहेत. त्यांनी हे लक्षात घ्यावं की सामान्य जनता पक्षप्रमुखांच्या मागे उभी आहे असं मत व्यक्त केले.

तर आमदार वैभव नाईक म्हणाले, विश्वासघात करून नाव चोरल, निशाणी चोरली, पक्ष चोरला, आमदार चोरले. पण, आमचा शिवसैनिक तुम्ही चोरू शकत नाही. आज सावंतवाडीत जमलेले शिवसैनिक हे त्यांचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. आज महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत. हे लोक त्यांना खतपाणी घालायच काम करत आहे. मराठी माणसा विरूद्ध कट रचला जात आहे. अनेक मुख्यमंत्री दबावाला बळी करत आहेत. पण, उद्धव ठाकरे दबावाला बळी पडले नाही, झुकले नाहीत. त्यांचा विरोध पक्षाला नाही तर प्रवृत्तीला आहे‌. लोकशाही टिकवायची गरज असताना मोदी सरकार म्हणून हुकुमशाही आणण्याच्या काम सुरु आहे. महाराष्ट्रात याला कडाडून विरोध झाला. आज लोकांचे प्रश्न बाजूला सारून राममंदिर, हिंदु-मुस्लिम वाद भडकवण्याच काम काही लोक करत आहेत. भाजपात गेल्यावर सगळं माफ होत आहे. दीपक केसरकर यांनी काय विकास केला हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ या कॅबिनेट मंत्र्यावर आली आहे. खासदार विनायक राऊत लोकसभेसाठी पुन्हा लढणार आहेत. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा. सत्य विरूद्ध असत्य अशी ही लढाई आहे‌. त्यामुळे महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही अन् झुकत नाही हे दाखवून देऊ असं विधान आ. वैभव नाईक यांनी केल. गौरीशंकर खोत म्हणाले, बाजीप्रभू प्रमाणे वैभव नाईक सिंधुदुर्गात लढत आहेत. त्यांना शैलेश परब, रूपेश राऊळ, बाळु परब, संजय गवस, मायकल डिसोझा आदींसारख्या लढवय्यांची साथ मिळत आहे. महाराष्ट्रात गुंडशाहीच राज्य सुरू आहे. भाजप आमदारन शिंदेंच्या शहरप्रमुखावर गोळ्या झाडल्या. एका अदृश्य मशीनच्याद्वारे भ्रष्टाचार केल्यानंतर नमो म्हणा आणि मंत्री व्हा अशी योजना आहे‌‌. स्थानिक आमदारांकडे ८८ कोटींची संपत्ती आली कशी हा सवाल आम्हाला पडतो. सावंतवाडीत एखादं दुकानही दिसत नाही. असेल तर त्याची कल्पना नाही अशी टीका त्यांनी केली. याप्रसंगी २०१४ ला ज्यांच्यासाठी आम्ही लढलो ते आज खोके घेऊन गेले. मतलबासाठी राजकीय बाप बदलणारे मंत्री हे सावंतवाडीचे आमदार आहेत अशी जहरी टीका महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी केली. ज्यांच्या विरुद्ध लढा दिला आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. त्यांच्यासाठी तिकीट मागायला आज ते पुढे आहेत. आज केसरकरांचे हात तुपात आहेत. पण, सामन्य जनता आहे तिकडेच आहे. शिवसेनेन तुम्हाला काय दिलं ? तुम्हाला मंत्री कुणी केलं ? उलट्या काळजाचे होऊ नका असा हल्लाबोल त्यांनी केला.

दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. उद्धव ठाकरेंना साथ देण्याच आवाहन त्यांनी केलं. तर खासदार विनायक राऊत म्हणाले, गद्दारी केली, बेइमानी केली त्यांना गाडायला उद्धव ठाकरे सावंतवाडीत आले आहेत. मंत्री होऊन काहीही उबवू न शकणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं जिल्हातील शासकीय मेडीकल कॉलेज हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात केली. आज त्याचा अभिमान आम्हाला वाटतो. कुटुंब प्रमुख म्हणून आपण कोकणवर प्रेम करत आहात. या परिवारातील लोकांना भेटायला आलात हे आमचं भाग्य आहे‌. बाळासाहेबांनंतरही ठाकरे कुटुंबाशी मातोश्रीशी इमान राखणार ही कोकणी जनता आहे अस ते म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरेंच स्वागत सावंतावडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्याच्यावतीन करण्यात आलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी खासदार विनायक राऊत,आ. भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आ. रमेश कोरगांवकर, दत्ता दळवी, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, वरूण सरदेसाई, मिलींद नार्वेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, सतिश सावंत, संजय पडते, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, बाळा गावडे, मायकल डिसोझा आदींसह मोठ्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित होते.