कोकीसरेतील संजय गजोबार स्वगृही !

सतिश सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश
Edited by:
Published on: November 07, 2024 12:01 PM
views 558  views

वैभववाडी : कोकीसरे विकास सेवा सोसायटीचे संचालक संजय नाना गजोबार यांनी ठाकरे सेनेचे प्रचार प्रमुख सतिश सावंत यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी रात्री त्यांनी आम नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर बुधवारी ते पुन्हा स्वगृही परतले.

     विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम तापू लागला आहे. प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अनेक पक्ष प्रवेश करुन घेतले जात आहे. कोकिसरे बांधवाडी येथील ठाकरे सेनेचे संजय नाना गजोबार, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. मात्र चोवीस तासांच्या आत ते पुन्हा ठाकरे सेनेत परतले. भाजपात माझा जबरदस्तीने प्रवेश करून घेतला होता. परंतु आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेसोबतच कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी  नंदू शिंदे,  मंगेश लोके,  रोहित पावसकर, बाळा पाल्ये, यशवंत गवांणकर, शंकर कोकरे, रमेश नारकर, श्रीकांत डाफळे, राजाराम गडकर, अनंत नादलसकर, चंद्रकात आम्रसकर, दीपक  आम्रसकर, उमाकांत राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते