उबाठाचे शाखाप्रमुख विजय भोगले - नितेश पिसे भाजपात

Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 23, 2024 05:27 AM
views 205  views

कणकवलीत : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कासार्डे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख विजय भोगले, नितेश पिसे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी नितेश पिसे व विजय भोगले यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल, आश्वासित केले.

यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे,  भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, संतोष पारकर, उपस्थित होते.