ठाकरे शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन १ ऑगस्टपर्यंत स्थगित

रास्तारोको करण्याचा प्रयत्न करणा-यांना पोलीसांनी घेतले ताब्यात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 29, 2023 18:36 PM
views 250  views

वैभववाडी :  तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेवरु ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज ता. २९ रोजी होणार रास्तारोको आंदोलन १ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिक्षक अभियंता १ऑगस्ट रोजी या महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यांनी यावेळी या मार्गाच्या दुरावस्थेबाबत ठोस निर्णय न घेतल्यास त्यानंतर तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले. 

   तळेरे-कोल्हापुर मार्गाची दुरावस्था झाली आहे. सध्या मार्गावरील भरण्यात येत असलेले खड्डे फक्त खडी टाकून भरण्यात येत आहेत.हे खड्डे पावसाळी डांबराने भरण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेची आहे. या करिता शिवसेनेने आज रास्तारोको आंदोलन होते. या आंदोलनाला आम.वैभव नाईक,माजी बॅक अध्यक्ष सतिश सावंत,संदेश पारकर , सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

सकाळपासून तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते येथील भैरी भवानी पेट्रोल पंपानजीक आंदोलनाकरिता जमले होते. आम.नाईक यांनी आंदोलन स्थळी आलेल्या महामार्ग प्राधिकरण उपकार्यकारी अभियंता यांच्या शी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चर्चा  केली. या मार्गावरील खड्डे फ्लेवर ब्लॉकने भरण्यात यावेत, गणेश चतुर्थी पुर्वी रस्ता खड्डेमुक्त व्हायला पाहिजे अशी मागणी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र त्यांच्याकडून याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी  येथील खड्यात केळीच झाड लावून रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मिधे सरकारचे करायचे काय- खाली डोकं वर पाय,या रस्त्याच्या कामाचे कमीशन खातय कोण -स्थानिक आमदाराशिवाय आहेच कोण अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.यानंतर पोलीसांनी आ.वैभव नाईक,संदेश पारकर,सतिश सावंत यांना ताब्यात घेत हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आम.नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणन  विभागाच्या अधिक्षक अभियंता श्री देशपांडे यांना दुरध्वनीवरुन संपर्क केला. त्यांच्याशी संदेश पारकर,सतिश सावंत बोलण केलं. त्यांनी या महामार्गाची दुरवस्थेची कल्पना त्यांना दिली. श्री.देशपांडे यांनी स्वतः येऊन १ऑगस्टला या मार्गाची पाहणी करण्याचे मान्य केले. प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविण्याबाबत योग्य ती पद्धत अवलंबली जाईल असे आश्वासन दिले. त्यामुळे १आॅगस्ट पर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र पावसाळी डांबर अथवा फ्लेवर ब्लॉकने खड्डे न बुजविल्यास त्यानंतर आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी उप जिल्हाप्रमुख नंदू शिंदे,तालुका प्रमुख. मंगेश लोके ,युवा सेना सचिव स्वप्नील धुरी,शहरप्रमुख शिवाजी राणे ,उप तालुका प्रमुख श्रीराम शिंगरे ,सुरेश पांचाळ,सुनिल रावराणे कोळपे सरपंच सुनिल कांबळे, लोरे सरपंच विलास नावळे, धनंजय हेर्लेकर, यशवंत गवाणकर, खांबाळे उपसरपंच गणेश पवार,बाबा मोरे, राजेश तावडे, जावेद पाटणकर, गौस पाटणकर, रोहीत पावसकर, समाधान काडगे, संदेश सुतार, सिद्धेश रावराणे, अनंत नंदलस्कर, जनार्दन विचारे, जाधव बुवा, श्रीकांत डाफळे, स्वप्नील रावराणे, सदानंद पाटिल, जयेश पवार, मंगेश सुद, अनिल नराम, देऊ मांजलकर, वाहतूक सेना प्रमुख बबन धुरी, मयूर दळवी, पांडरंग पांचाळ, दिपक पवार, सूर्यकांत परब, रियाज रमदुल, सलीम पाटणकर यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.


.