
सावंतवाडी : वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांनी शिवसेनेच्या राजन आंबेकर यांचा ५ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला. वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका स्वाती कदम यांच्या उपस्थितीत आज उपसरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
नवनिर्वाचित उपसरपंच यांचा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ व सरपंच गुणाजी गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी चंद्रकांत कासार,सुनील गावडे, शितल खांबल, शेखर खांबल, विजय गावडे संदीप गावडे विश्वास गावडे सचिन गावडे संतोष गावडे शरद जाधव, आर्यन राऊळ आदी उपस्थित होते.