मालवणात ठाकरे शिवसेनेला धक्का

आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 23, 2025 20:36 PM
views 36  views

मालवण : मालवणात उबाठाला धक्का बसला असून मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. निलेश राणे यांनी सर्वांचं शिवसेनेत स्वागत करत गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला. तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना उभी करताना राज्यात एक नंबरचा पक्ष करणार असा निर्धार त्यांनी केला.      

शिवसेना उबाठा गटाचे मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, माजी ग्रा सदस्य राघवेंद्र मुळीक, रीया आंगणे यांच्यासह शेकडो  कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसुरे विभागाच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सचिव दादा साईल, माजी जि प अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख निलेश बाईत, राजा गावडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर, युवती सेनेच्या श्रीमती पाटकर मॅडम , विनायक बाईत, दीपक पाटकर, सौ सरोज परब, सौ गायत्री ठाकूर, सौ लक्ष्मी पेडणेकर, निलेश गावकर, छोटू ठाकूर, शिवाजी परब, जितेंद्र परब, पुरुषोत्तम शिंगरे, सचिन पाटकर  आदी उपस्थित होते. 

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, गावाचे एकमत असल्यास मर्डे ग्रामपंचायतचे मसूरे नाव पुन्हा कायम केले जाईल. रमाई नदि मधील गाळ काढण्याबाबत नियोजन करण्यात येईल. खाजणवाडी खार बंधाऱ्यासाठी स्पेशल केस करावी लागली तरी केली जाईल. आज प्रवेश करून खऱ्या शिवसेनेत आपण आलात. शिंदे साहेबांनी संधी दिल्यामुळे विधिमंडळात तुमचे प्रश्न मांडत आहे. दत्ता सामंत यांचा पक्ष वाढवण्याचा वेग प्रचंड आहे. त्यांचा एकही शब्द पडू देणार नाही. ही जिवाभावाची संघटना आहे.  शिवसैनिक हे पद माझ्यासाठी फार मोठे आहे. पक्ष वाढवा, पक्ष जपा. येथील विकास कामांसाठी सर्व निधी पूर्णपणे मिळेल. महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी निधी मतदार संघात येत आहे. मी आमदार झाल्यानंतर 1200 कोटीची विकास कामे  होणार  आहेत. कुडाळ मालवणच्या वीज प्रश्नासाठी मोठा निधी मिळत असून एकूण 17 सबस्टेशन मंजूर झाली आहेत. विजेच्या प्रश्नाबाबत अधिवेशनात आवाज उठविल्यानंतर कोकण विभागाची बैठक पार पडली. त्यात कुडाळ मालवण मतदार संघाला प्राधान्य दिले आहे. पहिला निधी हा कुडाळ मालवणलाच मिळणार आहे. त्यामुळे विकासकामांची चिंता करू नका. जेवढी कामे असतील ती पूर्ण करू असा शब्द निलेश राणे यांनी दिला. 

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत  म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आजचे सर्व प्रवेश होत आहेत. अनेक प्रश्न आमदार निलेश राणे धडाडीने पूर्ण करत आहेत. तळाशील गाव समुद्रा पासून वाचावे यासाठी आमदार निलेश राणे यांनी तात्काळ उपयोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली. जर ते काम झालं नसतं तर आज अमावस्या असल्याने समुद्राच्या उधाणात गाव नष्ट झाला असता अशी भीती ग्रामस्थांना होती. या मतदार संघाला निलेश राणे यांच्या रुपाने एक अभ्यासू आमदार मिळाला आहे. अधिवेशनात आमदार निलेश राणे करत असलेली अभ्यासपूर्ण भाषणे पाहून विरोधक सुद्धा शांत असतात. मतदार संघातले मांडलेले प्रश्न पाहून आमची मागची दहा वर्षे फुकट गेल्याची आता लोकांमध्ये चर्चा आहे. 288 आमदारांमध्ये पहिल्या दहा मध्ये निलेश राणे यांचा नंबर लागतो. पुढची 25 वर्षे निलेश राणेच आमदार असतील असा विश्वासही दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

गावच्या विकासासाठी खऱ्या शिवसेनेत - राजेश गावकर

शिवसेनेत प्रवेश केलेले उबाठा मसुरे विभाग प्रमुख तथा माजी उपसरपंच राजेश गावकर म्हणाले, प्रवेशाचा निर्णय घ्यायला वेळ लागला त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या गावचा विकास झालाच पाहिजे हीच माझी भावना आहे. आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रेरित होऊन आज खऱ्या शिवसेनेत मी प्रवेश करत आहे. रमाई नदी गाळ, मसुरे ग्रामपंचायत नाव कायम रहावे, चांदेर - खाजणवाडी या भागात खार बंधारा व्हावा, तळणी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण प्रश्न, मेढा ते मागवणे रस्ता रुंदीकरण करणे, अशी मागणी त्यांनी केली. यापुढे सुद्धा पक्ष वाढीसाठी आणि गावच्या विकासासाठी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही अभिवचन राजेश गावकर यांनी यावेळी दिले.

यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हा प्रमुख संजय पडते, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग प्रमुख राघवेंद्र मुळीक, माजी ग्राप सदस्य रिया  आंगणे, बाबू आंगणे, प्रकाश चव्हाण, शैलेश आंगणे, गुरुदास कावले, शाखाप्रमुख गणेश गावकर, सुधीर गावकर, खाजनवाडी मंडळाचे अध्यक्ष सुहास गावकर, राजन गोळे, उत्तम गावकर, दत्तराज गावकर, शर्मिला गावकर, शिवानी गावकर, एकनाथ मेस्त्री, तुकाराम सावंत, एकनाथ परब, गणेश भोगले, महेश मूळये, महेश वंजारे, पांडुरंग परब, विनय परब, शंकर गावकर, शिवराम गावकर, संतोष गावकर, शुभांगी गावकर, काजल गावकर, राजाराम मुळीक, रमेश गावकर, बळवंत गावकर, राजू मुळीक, बाबुराव राणे, बाबू चौगुले अशा प्रमुख उबाठाच्या कार्यकर्त्यांसह मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील खाजनवाडी, चांदेर, मागवणे, तळाणी, मर्डे , वेरली, खेरवंद, आंगणेवाडी, देऊळवाडा या भागातील सुमारे 200 उबाठा कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

 यावेळी वेरली सरपंच धनंजय परब, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, बाबू परब, अनंत भोगले, पांडुरंग ठाकूर, शिवाजी परब, सचिन पाटकर, अशोक बागवे, उदय बागवे, राजू सावंत, अनंत भोगले, विलास मेस्त्री पुरुषोत्तम शिंगरे, लक्ष्मण शिंगरे, हिरबा तोंडवळकर,आदी मसुरे विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक दत्तप्रसाद पेडणेकर, सूत्रसंचालन पंढरीनाथ मसुरकर यांनी केले.