
कणकवली : गांधीनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मंगेश सावंत यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशावेळी गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, माजी सरपंच शेखर सावंत, मिलिंद बोभाटे, प्रशांत सावंत, सुधीर सावंत, अमीर सावंत भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गांधीनगर गावात झालेली विकासकामे आणि उर्वरित विकासकामांसाठी संदेश उर्फ गोटया सावंत, संजना सावंत यांचा सततचा असलेला पाठपुरावा यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे मंगेश सावंत यांनी सांगितले.