
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने सोमवारी सावंतवाडी विधानसभा कार्यकारणी बैठकीचे आयोजन सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिरमध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभेतील बेसिक उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला आघाडी प्रमुख व युवासेना प्रमुख पदापर्यंत सर्व पदाधिकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब, संजय गवस यांनी केले आहे.