ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी घेतले कुणकेश्वराचं दर्शन..!

Edited by:
Published on: March 08, 2024 09:52 AM
views 123  views

देवगड : ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अतुल रावराणे यांनी आज पहाटे श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले.देशातील लोकशाही अबाधित राखण्यासाठी सा-यांना बळ दे असं साकडं घातलं.कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून त्यांचं स्वागत करण्यात आले.

कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव कुणकेश्वराचा जत्रोत्सव कालपासून सुरू झाला आहे.आज पहाटे शासकीय पुजा झाल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे अतुल रावराणे यांनी श्री कुणकेश्वराचे दर्शन घेतले.दरवर्षी महाशिवरात्रीला ते कुणकेश्वराच्या दर्शनाला येतात.याहीवर्षी हजर राहून पहाटे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी कुणकेश्वराला देशातील लोकशाही अबाधित राखण्यासाठी  देशवासीयांना बळ मिळू दे .तसेच महाविकास आघाडीला येणाऱ्या सर्व निवडणुकीत यश मिळो दे असं साकडं श्री रावराणे यांनी घातलं.दर्शन घेतल्यानंतर श्री रावराणे यांच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.