हिंदी सक्तीच्याविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

कणकवलीत ३० जूनला शासन निर्णयाची होळी करणार
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 28, 2025 16:30 PM
views 86  views

कणकवली : भाजप-महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यात हिंदी सक्तीचा शासन निर्णय काढला आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषेचे महत्त्व कमी करण्याचा कुटील डाव सरकारचा आहे. हिंदी सक्तीच्याविरोधात आवाज उठविण्यासाठी कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोमवार ३० जून रोजी सकाळी ११ वाजता कणकवली पटवर्धन चौकात आंदोलन करून हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे.  

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात तालुक्यातील शिवसेना, महिला, युवासेना, शिवसेना संलग्न संघटनेच्या आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख कन्हैय्या पारकर, डॉ. प्रथमेश सावंत यांनी केले आहे.