वसुली सरकार कसे असते हे ठाकरेंच्या काळात पाहिले : नितेश राणे

Edited by:
Published on: October 14, 2024 14:22 PM
views 231  views

कणकवली : गुंडा राज,वसुली सरकार कसे असते हे उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात पाहिले. मोक्का लागलेले आरोपी घेवून राऊत सारखे लोक पत्रकार परिषदेत बसायचे.तर उध्दव  ठाकरे यांच्या महा विकास आघाडीच्या सरकार मध्ये मन्सुक हिरेन, दिशा सालियन अशा हत्या झाल्या. सचिन वाझे सारखे अधिकारी वसुली गँग चालवायचे. आता आमचे महा युती सरकार मध्ये तीन सिंघम राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत म्हणूनच दोन आरोपी पकडले गेलेत.ठाकरे मुख्यमंत्री असताना मन्सूक हिंरेन चे आरोपी का पकडले गेले नाहीत. दिशा सालियान चे आरोपी जेल मध्ये का गेले नाहीत असा सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.

आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांचा समाचार घेतला.ते म्हणाले ठाकरे सरकार मध्ये संजय राऊत सारख्या शक्ती कपूर कडून महिला सुरक्षित नव्हत्या आणि आता आम्हाला लेक्चर देत आहेत.तुझ्या मालकाच्या घरात गुंडाच्या टोळ्या आहेत. काही टिळक नगर मधील टोळ्या आणि काही दाऊद गँगचे पण आहेत त्यांची नाव आम्ही द्यायची का ? असा सवाल केला.सर्वात मोठा गुंडाचा लीडर मोतोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर बसलेला आहे.आम्हाला तोंड उघडायला लावू नका तुमचं वस्त्रहारण करु असा इशारा दिला.