
कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पहिल्या विद्यार्थी संघटनेच्या युनिटचा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते कुडाळ हायस्कुल कुडाळ ज्यू. कॉलेज व संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, येथे कॉलेजच्या समोर फलकाचे अनावरण करत उदघाटन करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यासह वैभववाडी तालुक्याची युवा कार्यकारणी जाहीर करत नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच यावेळी युवा सेना वडापाव हात गाड्याचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय शिरसाट, सुशांत नाईक, मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर,कुडाळ नगरपंचायत उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका सई काळप, श्रुती वर्दम, उदय मांजरेकर, श्रेया गवंडे सुशांत नाईक, मंदार शिरसाट, रुची राऊत, योगेश धुरी, तेजश्री परब, आदी उपस्थित होते.