ठाकरे गटाच्या आमदारांना चुकीच्या पद्धतीने कामे दिलेली : निलेश राणे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 05, 2024 17:56 PM
views 234  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक कामांबाबत स्थगिती उठवली असे जरी ते सांगत असले तरी ते खोट आहे. ठाकरे सरकारच्या काळात अनेक कामे चुकीच्या पद्धतीने ठाकरे गटाच्या आमदारांना दिली होती, मात्र तसे करता येत नसल्याने म्हणून  ही कामे स्थगित केली होती. आणि विरोधात विरोधी गटातील 84 आमदारांनी एकत्र येत याचिका दाखल केली होती. मात्र यामध्ये सगळ्या कामांची स्थगिती उठली नसून काही थोडक्यात कामांची स्थगिती उठवण्यात आली आहे. असे निलेश राणे यांनी सांगितले.

पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले, ठाकरे सरकारच्या काळात ठाकरे गटाच्या आमदारांना चुकीच्या पद्धतीने काही कामे देण्यात आली होती. या कामांना सद्यस्थितीच्या सरकारने स्थगित केले होते. व व अद्यापही चुकीच्या कामांची स्थगिती उठवलेली नाही. तर जी कामे योग्य वाटली त्या कामांची स्थगिती उठवण्यात आलेली आहे. मात्र एकट्या वैभव नाईकांच्या याचिकेवर ही स्थगिती उठवण्यात आलेली नाही. असे सांगत निलेश राणे यांनी मी वैभव नाईक यांनी आपली काम कोणती ती सांगावीत, तर याआधी घेतलेल्या पत्रकार परिषद वैभव नाईक यांनी 40 कोटीची आकडेवारी जाहीर केली,

पण ही आकडेवारी कुठून आली  समजू शकलेले नाही. मात्र मी जी बातमी वाचली त्यामध्ये सहा कोटी 95 लाखाची स्थगिती उठल्याचे लिहिले आहे. त्यामुळे आमदार बघून एक धादांत खोटे बोलत आहेत अशी टीका निलेश राणे यांनी करत केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या अधिकृत पत्राने देण्यात आलेल्या कामांना व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहीने जी कामे मंजूर होत आहेत ती मी माझे काम सांगत आलो आहे. जर आमदार वैभव नाईक यांना बजेट समजत नसेल तर त्यांनी माझ्यासोबत बसून बजेट समजून घ्यावं असे चॅलेंज आमदार वैभव नाईक यांना देत. वैभव नाईक यांना त्याची आमदारकी कळलेली ते निधी आणण्यात सपशेल फेल गेले आहेत अशी टीका  निलेश राणे यांनी केली.