उबाठाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे कार्यकर्त्यांसमवेत भाजपात !

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 29, 2024 07:18 AM
views 373  views

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा पक्षाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे व उबाठा कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी  हा पक्षप्रवेश झाला.

 उद्धव बाळासाहेब ठाकरे  यांच्या पक्षाकडून  कोणतीच  विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोनाळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली.गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतोअसा विश्वास आपल्याला असल्यामुळे आम्ही प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे ते म्हणाले.

यावेळी  आमदार नितेश राणे यांच्यासह माजी सभापती अरविंद रावराणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश शेलार, बूथ प्रमुख समाधान जाधव, आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते..