अर्ज छाननीत ठाकरे शिवसेनेला धक्का

कणकवलीतील बिडवाडी पं. स. भाजपसाठी बिनविरोध
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: January 22, 2026 12:27 PM
views 347  views

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली तहसील कार्यालयामध्ये आता अर्ज छाननी सुरू असून यामध्ये बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे.

विद्या शिंदे यांना 2014 नंतर तीन अपत्ये झाली असल्याबाबत भाजपचे उमेदवार संजना राणे यांनी आपल्या वकिलांमार्फत हरकत घेतली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवला. अर्थातच बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातून भाजपच्या संजना राणे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. संजना राणे यांच्या बिनविरोध विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.