
वैभववाडी : पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ठाकरे शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. तसेच सुरक्षिततेच्या कडक उपाययोजना करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यात २८निष्पाप नागरिक मारले गेले. या घटनेचा आज ठाकरे शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. तहसिल कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच तहसीलदार सुर्यकांत पाटील व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर, शहर प्रमुख मनोज सावंत, उपतालुकाप्रमुख संतोष पाटील, अल्पसंख्याक तालुका प्रमुख जावेद पाटणकर, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, यशवंत गवाणकर, स्वप्नील रावराणे, नितेश शेलार, राजाराम गडकर आदी उपस्थित होते.