झारापमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 18, 2024 06:22 AM
views 657  views

कुडाळ : झाराप पंचक्रोशीतील युवानेतृत्व अनिकेत तेंडुलकर, बाबू खान यांनी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबनजी शिंदे, तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख अरविंद करलकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, शिवसेना उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी जिल्हाप्रमुख संजयआंग्रे व महिला आघाडी प्रमुख श्रीमती वर्षाताई कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक रूपेशपावसकर यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.