
कणकवली : कणकवली एस टी एसटी स्टँडसमोर सर्विस रस्त्यावर टेम्पोची बसला धडक बसून अपघात झाला. कुडाळरून कणकवलीच्या दिशेने येणारा मॅक्स पिकअप टेम्पो व रत्नागिरीवरून सावंतवाडीकडे जाणारी एसटी कणकवली आगारामध्ये प्रवेश करत असताना टेम्पोची धडक एसटीला बसली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी टेम्पोच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे काही वेळ सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.