
सावंतवाडी : श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा, सावंतवाडी येथे आषाढ शुध्द प्रतिपदे रोजी सालाबादप्रमाणे प.प.श्री. टेंबे स्वामी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने सकाळी एकमुखी दत्त पूजा, एकादशमी व लघु रुद्र, श्री सत्यदत्त महापूजा, श्रींची आरती, महाप्रसाद, आरती, श्री टेंबे स्वामी पालखी सोहळा, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविक भक्तगणांनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहून स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, भक्तमंडळी उपस्थित होते.