सावंतवाडीतील एकमुखी दत्त मंदिरात टेंबे स्वामींचा १६९ वा जयंती उत्सव..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 01, 2023 20:20 PM
views 184  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिर खासकिलवाडा येथे सोमवार दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची १६९ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.

श्री. टेंबे स्वामी जयंती उत्सवानिमित्त पुढील प्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी ८.०० वा. अभिषेक व पूजन. ९.०० वा. पवमान आवृत्त्या. दुपारी १२.३० वा. आरती व त्यानंतर १.०० वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.०० ते ७.३० वाजेपर्यंत नामस्मरण आणि सायंकाळी ७.३० वा. आरती होणार आहे. तरी सर्व गुरु भक्तांनी स्वामी दर्शन, महाप्रसाद व नामस्मरण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिर कमिटीकडून करण्यात आले आहे.