
सावंतवाडी : वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त ३५ वा वधू-वर परिचय मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी सावंतवाडीतील वैश्य भवन हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी वैश्य समाज बांधव तथा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना राजन तेली यांनी मंत्री केसरकर यांच नाव न घेता चिमटे काढले. तेली म्हणाले, समाजाला वेळ देणं आवश्यक आहे. नेहमीच घड्याळाकडे पाहून चालत नाही. मी देखील काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण चुकवल, कारण आजच्या या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचा शब्द मी दिला होता. त्याप्रमाणे मी उपस्थित राहिलो.
त्यामुळे समाजाला वेळ देणं आवश्यक आहे. आम्ही रिकामी माणसं आहोत अस भाष्य केलं.
तर, मी देखील आता सावंतवाडीत घर बांधलय. त्यामुळे बाहेरचा कणकवलीचा असं होणार नाही. त्यामुळेच वैश्य भवनासमोरच घर बांधलंय अशी मिश्किल टोलेबाजी राजन तेली यांनी केली. तर हे राजकीय व्यासपीठ नाही. परंतु, वैश्य व वाणी हे वेगळे नाहीत. वैश्यवाणी हा एकच समाज आहे. यासाठीची लढाई आता सुप्रिम कोर्टात लढायची वेळ आली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून जी मदत लागेल ती देण्याच मान्य केले आहे. मी या विषयात हात घालायला तयार आहे. याच श्रेय तुम्ही कुणालाही द्या पण यात मध्ये येऊ नका अस मत तेलींनी व्यक्त केले.
तर समाजाला विचारात घेतल्याशिवाय या मतदारसंघात कोणताही पक्ष पुढे जाऊ शतक नाही. आम्ही समाजाच्या पाठिंब्यामुळे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. तिथ काम करण्याची संधी आम्हाला मिळाली असं मत व्यक्त करत अध्यक्षीय मनोगताच्या समारोपा दरम्यान, थोड कटू बोललो, पण खरं बोललो. काही चुकल तर माफ करा असे सांगत आपला समाज हा कमी नाही आहे. आपली ताकद आपणच ओळखायला हवी. आपल्यासमोर समाजातील अनेक आदर्श आहेत. आपल्या ओळखीचा व अनुभवाचा फायदा घेत समाजाच भल करूया असे मत तेली यांनी व्यक्त केले.