
वेंगुर्ला : पुस्तकी ज्ञानासोबत रोबोटीक सारख्या विषयाबाबत सुध्दा विद्यार्थ्यांना ज्ञान आवश्यक असून हि काळाजी गरज आहे असे उद्गगार बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चौगुले यांनी राष्ट्रीय स्तरावरील दूरदर्शन रोबोकॉन स्पर्धा उपविजेते ऋषिकेश घोगळे यांचा सत्कार समारंभ प्रसंगी काढले.
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या दूरदर्शन रोबोकॉन स्पर्धेत द्वितीय उपविजेते वेंगुर्ल्याचे सुपुत्र ऋषिकेश संजय घोगळे यांचे खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले येथे PCB making on Autodesk Eagle And Fabrication या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ऋषिकेश घोगळे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. चौगुले यांचे हस्ते करण्यात आला. व्यासपिठावर पर्यवेक्षक प्रा. शितोळे व अप्पर कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग संजय घोगळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. शितोळे यांनी केले तर प्रा. शिरोळकर यांनी आभार प्रदर्शन केले. या व्याख्यानाला प्रा. एस एस दिक्षीत, प्रा. कोंडेकर तसेच अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.