
सावंतावडी : अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी धडक कारवाई केली आहे. शुक्रवारी दुपारी सावरजुवा येथील वाळू रॅम्प व इतर साहित्य नष्ट करण्यात आले.
या कार्यवाही वेळी तहसीलदार श्रीधर पाटील, दाणोली तलाठी श्री. चितारे, आरोंदा तलाठी पोले , आरोंदा उपसरपंच सुभाष नाईक, आरोंदा कोतवाल जाधव व पोलीस कर्मचारी दळवी उपस्थित होते. दरम्यान, कारवाई करणाऱ्या महसूल पथकाला पाहताच वाळू उपसा करणऱ्या होड्यांनी गोवा हद्दीत पळ काढला.