अतिरिक्त सजा कार्यभार असलेल्या कार्यालयाच्या चाव्या तहसीलदारांकडे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 16, 2023 13:53 PM
views 204  views

कुडाळ : अतिरिक्त 39 सजांचे कार्यभार, इ फेरफार ई पिक पाहणी, ई चावडी यामध्ये येणाऱ्या अडी अडचणींबाबत लक्ष वेधण्यासाठी आज तहसीलदार अमोल फाटक यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघ शाखा कुडाळ यांच्या वतीने अतिरिक्त सजा कार्यभार असलेल्या कार्यालयाच्या चाव्या  देण्यात आल्या.

हे आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आठही तालुक्यात होत आहे, आज कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयासमोर एकत्र येत कुडाळ तालुक्यातील  अतिरिक्त सजा कार्यभार असणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्यानी एकत्र येत तहसीलदार अमोल फाटक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कुडाळ तालुका तलाठी संघटना अध्यक्ष एकनाथ गंगावणे, सचिव विश्वास शेणवी, संघटक विजय पास्ते, संतोष बांदेकर, गुरुनाथ गुरव, श्रीमती भोगटे,श्रीमती  गायकवाड, आदी तलाठी उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यात एकूण 59 तलाठी सजा आहेत मात्र 39 सजाचा 20 तलाठी यांच्यावर जरी अतिरिक्त कार्यभार असला व सजा कार्यालय बंद असले तरी  निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, हे काम सुरू ठेवणार असल्याचे तालुका अध्यक्ष श्री गंगावणे यांनी सांगितले, कुडाळ तालुक्यात सुमारे तीन लाखाहून अधिक सातबारे असून यामुळे ईपीक पाणी ई चावडी यासारखी ऑनलाईन करताना येणाऱ्या वारंवार अडचणी पाहता  शासनाने तत्काळ यावरती तोडगा काढावा अशी मागणी यावेळी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या वतीने तहसीलदार अमोल फाटक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.