
कणकवली : महसूल विभागात तलाठी भाऊ ते तहसीलदार या पदांवर 36 वर्ष नागरिकांचे विविध प्रश्न नियमात राहून सोडवले आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार रमेश पवार सेवानिवृत्त होत आहेत देवगड तहसीलदार म्हणून कार्यरत असताना रमेश पवार यांनी प्रशासकीय कामकाजात तत्परता ठेवत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.
तसेच कणकवली देखील तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार म्हणून बरीच वर्ष कार्यरत राहून कणकवली वासियांच्या मनात घर केले त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महसूल अधिकारी कर्मचारी व आम्हीं कणकवलीकर वासीयांच्या वतीने 31 मे रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे सायंकाळी 6 वा पवार यांचा नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी रुंद सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी तहसीलदार रमेश पवार प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.










