वैभववाडी शहरातील 'ते' काम थांबवण्यासाठी तहसीलदार यांची नोटीस

महसुल विभाग अॅक्शन मोडवर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 17, 2023 11:02 AM
views 390  views

वैभववाडी: शहरातील शासकीय गोदामानजीकच्या सर्व्हे क्रमांक ३६/१ या जागेत सुरू असलेल्या बांधकामाबाबत  महसुल विभाग अॅक्शन मोडवर आल आहे.  या जागेत विनापरवाना सुरू असलेले बांधकाम तत्काळ थांबवावे अशी नोटीस महसुल विभागाने नगरपंचायतीला दिली आहे.दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी देखील नोटीस लावण्यात आली आहे.याठिकाणी स्टाॅल उभारण्याचे काम सुरू आहे. या बांधकामासंदर्भात ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी तहसिलदारांकडे तक्रार दिली होती.

      वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीतील महसुल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व्हे क्रमांक ३६/१ मध्ये सध्या रस्त्याकडेला बांधकाम सुरू आहे.या ठिकाणी स्टॉलधारकांसाठी पक्के स्टॉल उभारण्यात येत असल्याचे सांगीतले जात आहे.स्टॉलधारकांसाठी तात्पुरत्या शेड उभारण्यासाठी सर्व्हे क्रमांक ३०,३१,३२,३३ मध्ये परवानगी मिळावी असा अर्ज तहसिलदारांकडे दिला होता.परंतु या अर्जाच्या अनुषंगाने तहसिलदारांनी अशा प्रकारची परवानगी देण्याचा अधिकारी आपल्याला नसल्याचे नगरपंचायतीला कळविले आहे.याशिवाय जागेचा ताबा मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करावा असा सल्ला देखील दिला आहे.परंतु सध्या सर्व्हे क्रमांक ३६/१ मध्ये सुरू असलेले विनापरवाना अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे अशी सुचना देखील केली आहे.याशिवाय महसुल विभागाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही जागा महसुल विभागाची मालकीची असुन या जागेत कुणीही अतिक्रमण करू नये अशी नोटीस चिकटविली आहे.

शासकीय जागेत अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी तहसिलदारांकडे केली होती.त्यानंतर तहसिलदारांनी ही कारवाई केली आहे.दरम्यान महसुलच्या नोटीशीनंतर बांधकाम थांबविण्यात आले आहे.


फोटो ओळी: शहरातील शासकीय जागेवर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी महसूल विभागाने नोटीस लावली आहे.