
मंडणगड : एम.पी.एस. परिक्षेच्या माध्यमातून राज्यशासनाच्या सेवेत कार्यरत असलेले युवा प्रशासकीय अधिकारी अक्षय अशोक ढाकणे यांनी मंडणगड तालुक्याचे तहसिलदार पदाचा कार्यभार 3 सप्टेंबर रोजी स्विकारला. यावेळी निवासी नायब तथा प्रभारी तहसीलदार संजय गुरव, श्री. जाधव, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, प्रकाश साळवी, सुरज गायकवाड, तलाठी मनोहर पवार, मयुर पंडीत, संजय गावकर यांच्यासह तहसिल कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पुर्वीचे तहसिलदार श्रीधर गालीपिल्ले यांची बढती मिळून बदली झाल्याने गेल्या काही दिवसांपासून निवासी नायब तहसिलदार संजय गुरव यांच्याकडे या पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. दरम्यान तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. ढेकणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्रशासनाचा कणा असलेल्या या महत्वाच्या पदासाठी तालुक्यात पुर्ण वेळेसाठी अधिकारी उपलब्ध करण्यात आल्याने समाधानही व्यक्त केले.