
सावंतवाडी : आजवर मी खुन करणारे उमेदवार, खुनाचे आरोप असणारे उमेदवारासह स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार बघितले. पण, नीच पातळीवर राजकारण करणारे उमेदवार बघितले नाहीत. हे उमेदवार महाभारतातील शिखंडी सारखे आहेत. हिंमत असेल तर स्वतःच्या नावाने पत्रक काढायला हवी होती अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी टीका करत उबाठा शिवसेनेच चिन्ह असलेल्या पत्राची चिरफाड केली. केलेल्या आरोपांचे खंडन करत जनतेनं या फसव्या पत्रकांना बळी पडू नये असं आवाहन केलं. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, प्राचाराच्या शेवटच्या दिवशी लोक रॅली काढतात, जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधतात. मात्र, सावंतवाडी मतदारसंघातील एक विरोध आहे जे शेवटच्या दिवशी पत्रक काढतात. त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो अन् समोरच्याला त्याच उत्तर देता येत नाही. यावरून किती नीच पातळीवर राजकारण गेलं हे कळत.आजवर मी खुन करणारे उमेदवार, खुनाचे आरोप असणारे उमेदवारासह स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार बघितले. पण, नीच पातळीवर राजकारण करणारे उमेदवार बघितले नाहीत. या लोकांना निवडणूक आयोगानं बंदी घातली पाहिजे. तसंच बॅनर आणि बोर्ड लावण्यापासून यांच्या मुलांनाही रोखल पाहिजे अशी जोरदार टीका श्री. केसरकर यांनी करत उबाठा शिवसेनेचा लोगो असलेल्या पत्रकाची चिरफाड केली. चष्मा कारखाना, एमआयडीसी, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, फिशींग व्हीलेज, ताजचे फाईव्हस्टार हॉटेल, पर्यटन प्रकल्पांवरून पत्रकात केलेल्या टीकेचा समाचार श्री. केसरकर यांनी घेतला. हे उमेदवार महाभारतातील शिखंडी सारखे आहेत. हिंमत असेल तर स्वतःच्या नावाने पत्रक काढायला हवी होती असा टोलाही हाणला.
वेळागर येथील ताज प्रकल्पासाठी भूसंपादन करून 28 वर्षे झाली. पत्रक काढणाऱ्यांना अभ्यास कमी दिसतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर मी तीन दिवसात हा प्रकल्प मंजूर केला. शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेल्या जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही याबाबतचे लेखी पत्र त्यांना दिले आहे. राजन तेलींनी फक्त लोकांना भडकावण्याचे काम केले. भूमिपूजनाला आमच्यात बसायचं आणि तिकडे जाऊन गोंधळ घालायचा ही काम त्यांनी केलीत अशी टीका केसरकर यांनी केली. महायुतीने लोकांसाठी अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे आमचा भरघोस मतांनी विजयी निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना पत्रक जाहीर केले तरी माझ्यावर सावंतवाडीची जनता प्रेम करते. सर्व औद्योगिक कारखाने मी आणले. पैकाणे यांच्या माध्यमातून खासगी कारखाने उभारले. स्थानिकांना रोजगार दिला. प्रकल्प बाधितांना नोकरीत प्राधान्य असावा हा माझा पहिला हेतु असतो. ज्यांच्या जमीनी प्रकल्पात गेल्यात त्यांना नोकऱ्या दिल्या. चष्म्याचा कारखाना वाफोली येथे उभारण्यात येणार होता. मात्र, आपत्तीत येथे नुकसान झाल्याने तो गोव्यात गेला. तेथे आता जनरेटर कारखाना असून अनेक मुलं काम करत आहे. लवकरच सुरू होणाऱ्या सोलर कारखान्यामध्ये मिळून हजारो मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सावंतवाडी येथील डाटा सेंटरमध्ये काम करणार मुलांचे थकीत पगार मी मिळवून दिले. माझ्याकडे येणाऱ्या औद्योगिक कंपन्यांना मी मदत करण्याचे काम करतो. काजू कारखानदारांना 280 कोटी रुपये मंजूर करून दिले. रत्नसिंधूमधून सावंतवाडी टर्मिनसच्या पाणीप्रश्नास सहा कोटी रुपये मंजूर केले. तेथे पर्यटनात्मक चालना देण्याचा प्रयत्न केला. चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केला. मात्र तेथे पुरेशी विमाने येत नाहीत. भविष्यात विमानांची संख्या वाढल्यानंतर तेथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तिलारी येथील युवकांना रोजगारसबंधी वन टाइम सेटलमेंट करून दिली. वेळागर येथील शेतकऱ्यांवर आंदोलनानंतर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हेही मागे घेतले. मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल ही माझी संकल्पना असून त्यासाठी निधी मी आणला. त्याचे टेंडर, वर्क ऑर्डर झालेली असून एक सही झाली की याचे काम सुरू होईल. बांबोळी, बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे रुग्णांना तेथे पैसे भरण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले.
विरोधक माझ्या संपत्तीवरून टीका करत आहे. मात्र माझी संपत्ती ही वडिलोपार्जित आहे. माझ्याकडील जमिनींचे दर दुप्पट झाल्याने संपत्तीत वाढ झाली आहे. जमिनींची विक्री करणारा मी एकमेव आमदार आहे. एकही नवी जागा मी खरेदी केलेली नाही. लाकडी खेळण्याचे संवर्धन करण्यासाठी येथे म्युझियम उभारण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी डेपो आणि एसटी स्टँड नवीन करण्यासाठी सहा कोटींचा निधी मी दिला आहे. लँडमाफीया उमेदवार निवडणूकीसाठी उभा आहे. मी सासोली येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांचा जमीन प्रश्न सोडवणार आहे. मी कोल्हापूरचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्गचा फायदा करून दिला आहे. वन जमीनीचा प्रश्न मार्गी लावला. तर शेतकऱ्यांना ५० हजार दंडाच्या निर्णयाला मी विरोध केला होता. ठराविक झाडे कापण्यासाठी यात वगळण्यात आलीत. त्यामुळे दंड आकारता येणार नाही. ग्रामस्थांचा मायनिंगला विरोध असेल तर माझाही विरोध आहे. जी ग्रामपंचायत त्याला समर्थन देईल तिथे माझा विरोध नसेल. शिरशिंगे येथील धरणाला 600 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे तसेच पारपोली येथे फुलपाखरांचे गाव वसविण्यात आले आहे. पाच वर्षात पंचविसशे कोटींची विकासकामे मी केलीत. येणार सरकार आमचं असेल त्यामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब उपस्थित होते.