इंडियन स्वच्छता लीग 2.0 साठी कणकवली न.पं.कडून संघाची घोषणा

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 13, 2023 14:41 PM
views 136  views

कणकवली : केंद्र शासन आयोजित इंडियन स्वच्छता लीग 2.0  या स्पर्धेत कणकवली शहर सहभागी झाले आहे. कणकवली शहराच्या संघाचे नाव कणकवली नाईट रायडर्स ( Kankavali Knight Riders ) असे असून या संघाच्या कर्णधारपदी अमोल भोगले यांची निवड करण्यात आली आहे, तर मोहीम प्रचारक (Brand Ambassador) पदी श्री. दिपक बेलवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांची घोषणा मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केली.

केंद्र शासन कडून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर  या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरामध्ये इंडियन स्वच्छता लीग 2.0 हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी आपल्या स्वच्छ आणि सुंदर कणकवलीला केंद्र स्तरावर यशस्वी करण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वा पटकीदेवी मंदिर ते पटवर्धन चौक पर्यत स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पटवर्धन चौक येथे स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पथनाटय सादर करण्यात येईल. यानंतर कणकवली बस डेपो व आंबेडकर भवन येथे स्वच्छता मोहिमे घेण्यात येणार असून शहरातील सर्व नागरीकानी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायतकडून करण्यात येत आहे.