
कुडाळ : अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही आमच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने अन्याय व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवून यश मिळवले आहे हेच सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटित झाले पाहिजे आपल्या संघटनेचे काम सर्व दूर पोहोचले पाहिजे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी कुडाळ येथील स्नेह मेळाव्यात केले
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा कुडाळ तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा स्नेहमेळावा मराठा समाज सभागृह कुडाळ येथे तालुकाध्यक्ष श्री. घनःश्याम के. वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ता 16 आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश दळवी श्री. ना.य. सावंत श्री. किशोर नरसूले श्री. औदुंबर मर्गज जिल्हा सचिवश्री. सुंदर पारकर जिल्हा सदस्य श्री. मनोहर खामकर तालुका सल्लागार श्री. अरुण साळगावकर कुडाळ तालुका सचिव मनोहर सरमळकर दत्ताराम पटनाईक श्री भालेराव ,विजय चौकेकर, स्मिता पाटील दीपमाला राऊळ, विनायक राज्याध्यक्ष, श्री गोसावी, श्रीमती वैजयंती देसाई ,म.ना गावडे ,श्री राऊळ सेवानिवृत्त शिक्षक जिल्ह्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री अणावकर म्हणाले, माणसाने मानवतावादी दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी आम्ही त्या काळात प्राथमिक शाळेतून शिक्षण देऊन अनेक विद्यार्थी घडविले आहेत पण आजचे शिक्षण क्षेत्र बदलले आहे आजची शिक्षण पद्धत ही पैशाचा बाजार झालेली आहे समाजात सुरू असलेल्या अशा सर्व अघटीत गोष्टीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी लोकशाहीचा चौथ्या स्तंभाने महत्वाची भूमिका बजावली पाहिजे देशाचे सुजाण नागरिक, अधिकारी घडविण्याचे काम आमच्यासारख्या शिक्षकांनी केले आहे. आमच्या असोसिएशनला 16 वर्षे झाली असून संघटनेला उर्जा देणारी आहे.
शिक्षक नेते प्रकाश दळवी म्हणाले, आमची संघटना नेहमीच अन्यायाच्या विरोधात लढली आहे . जिल्ह्यात अनेक संघटना झाल्या . संघटनेत येण्यासाठी अनेकजण प्रलोभने दाखवितात त्यांना बळी पडू नका. सर्व आपण एकजीव झालो.भविष्यात आनंदीमय जीवन जगण्यासाठी आनंददायी मेळावे, सहलीचे आयोजन केले पाहिजे आपले अनेक प्रश्न आहेत सर्व आदेश असूनही ही कामे होत नाहीत,यासाठी काही गुर्मी अधिकारी असणाऱ्याना आता सळो की पळो करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे असे सांगितले यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष घनःश्याम वालावलकर यांनी संघटनेचा धावता आढावा घेतला. सूत्रसंचालन व आभार तालुका सचिव मनोहर सरमळकर यांनी मानले.
75 वर्षे पूर्ण झालेल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये स्मिता पाटील, सिताराम तळेकर, सदाशिव पाटील, हेमलता खानोलकर, लक्ष्मण धुरी, श ल नाईक, विजय मेस्त्री, सुभाष देसाई, मालिनी बांदेकर, गोपाळ प्रभू, विभावरी साळगावकर, बापू आडेलकर, सुचिता प्रभू, माधुरी राऊत, सुरेखा कामत, विद्याधर वाळके, प्रणाली वजराटकर, रामचंद्र कुडाळकर, सुहास सावंत, स्नेहलता पाग्रडकर, सुरेश कुबल, नारायण पाटकर, प्रकाश धावडे, अरुण साळगावकर, काशीराम कुबल, मधुकर बोर्डवेकर ,परशुराम पिंगुळकर यांचा समावेश होता.










